परिस्थिती अतिशय भीषण आहे. भविष्यात त्याचे पडसाद कसे उमटतील, येत्या काळात त्याचे परिणाम कसे भोगावे लागतील माहीत नाही. मराठी माध्यमातून शिकून इथवर आलेली पिढी आपल्या पाल्यांना मात्र त्या माध्यमातून शिकवायला तयार नाही. सर्वांची स्वप्नं आकाशाला भिडणारी आहेत. त्यापेक्षा कमी कुणालाच काहीच नकोय्. यश, अपयशाचे मापदंड ठरले आहेत. त्या चाकोरीबाहेर जायची तयारी नाही कुणाचीच. बरं, यशाचे आकर्षण इतके की, अपयश थेट...